Home Blog Page 156

Gaan Vaju Dya – Video Song – Khwada

 

“Gana Vaju Dya’ is the next song of Adarsh and this song is from the National Award winning movie ‘Khwada’. Its music composed by Rohit Nagbhide and lyrics penned by Dr. Vinayak Pawar.


 

 

 

TagMag Marathi Song – Rajwade And Sons

Tagmag song features Sidharth Menon, Alok Rajwade, Mrunmayee Godbole, Krutika Deo.


 


 

Multistarer Shasan Coming Soon In Theators

मल्टीस्टारर सिनेमा शासन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 
सिनेमा हा समाजाचा प्रतिबिंब असतो  असा म्हटलं जातं, सिनेमातून समाज प्रबोधनही केल जातं. मराठी सिनेमा बदलतो आहे, अनेक चांगले विषय मराठीसृष्टीत हाताळले जात आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन येतोय शासन हा सिनेमा. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळून मराठी सिनेसृष्टीला दर्जेदार चित्रपटांच दिग्दर्शन करणारे गजेंद्र अहिरे यांच्या शासन सिनेमात आपल्यलाला दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.शासन सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. गजेंद्र अहिरे हे मराठी चित्रपट सृष्टीतले बहुचर्चित आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.
राजकारण हा एक असा खेळ आहे की यात सगळेजण भाग घेण्यास उत्सुक असतात. आणि या खेळात जिंकण्यासाठी वाटेल ते करायची तयारी या खेळात सहभागी झालेल्या राजकारण्याची असते. राजकारणामध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेलेला युनिअन लीडर अशाच उद्भवलेल्या एका परिस्थितीचा फायदा कसा करून घेतो याचे चित्रिकरण या सिनेमात करण्यात आले आहे.
शेखर पाठक हे या सिनेमाचे निर्माते तसेच प्रस्तुतकर्ता असून श्रेया फिल्म्स प्रा. लि . या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  मकरंद अनासपुरे,  भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, अदिती भागवत,वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले,मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ . श्रीराम लागू, अमेय धारे,  किरण करमरकर  अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे.मराठीतले ख्यातनाम कवी आणि साहित्यिक  विं दा करंदीकर यांची माझ्या मना बन दगड या कवितेला नरेंद्र भिडे यांनी संगीत दिला असून जसराज जोशी याने हे गाणं गायल आहे. त्याचप्रमाणे  नरेंद्र भिडे यांनी सिनेमाचे संगीत दिग्दर्शन केले असून जयदीप वैद्य यांनी देखील  गाण गायलं आहे. एकंदरच दिग्गज कलाकारांनी नटलेला असा शासन हा सिनेमा २२ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यात प्रदर्शित होणार आहे.

Sangita Ahir – Interview

स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही – निर्माती संगीता आहिर

गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहात निर्माती म्हणून काय आव्हान पेललीत?
याबाबतीत मी नशीबवान आहे. माझ्या वाट्याला फार काही स्ट्रगल आला नाही. निर्माती होण्यासाठी मी व्यवस्थित पेपरवर्क केलं. करत असलेल्या प्रोजेक्टची आणि त्याच्यासाठी लागल्या गोष्टीची सखोल माहिती करून घेतली. या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार मंडळींशी मी बोलले त्यांच्याकडून बरंच काही शिकले. त्यासोबत मला लाभलेली सगळ्यांची साथ खूप मोलाची ठरली. आता मी निर्माती म्हणून दगडी चाळ आणि ‘कॅलेंडर गर्ल्स’ असे दोन सिनेमे करतेय.

रिअलिस्टिक चित्रपट करणाऱ्या दोन व्यक्ती या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेत कसा अनुभव होता ?
मधूर आणि आणि माझ्यातील एक सामाईक दुवा म्हणजे कोणत्याही प्रोजेक्टचा आम्ही सखोल अभ्यास करतो. एकसारख्या विचारांची माणसं एकत्र आल्यावर नक्कीच काम उत्तम होणार यात शंका नाही. मुळात मी इंटिरियर डिझायनर असल्याने सिनेमाशी थेट संपर्क आला नाही. मात्र सिनेमाचा सेट किंवा त्याची डिझायनिंग कशी असते किंवा असावी याची साधारण माहिती होती. मधुरने जेव्हा ‘कॅलेंडर गर्ल्स’ हा प्रोजेक्ट माझ्याशी शेअर केला  तेव्हा आम्ही बरीच चर्चा केली. मॉडलिंग क्षेत्राबाबत आजही बरीच उत्सुकता आपल्यात आहे. मुळात मला महिलांशी संबधित एक सिनेमा करण्याचा उद्देश्य असल्याने या सिनेमाच्या निर्मिती मी मनापासून स्वीकारली.

तुमच्या मते सिनेमा उत्तम होण्यासाठी अचूक निर्मिती मुल्य काय असावीत?
एक उत्तम सिनेमा होण्यासाठी खूप प्लानिंग लागतं. मुळात आपल्या योजना आणि कल्पना पारदर्शी असाव्या लागतात. त्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये किती गरज आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा. मी स्वतः एक महिला असल्यामुळे मी करत असलेल्या इतर जणींना देखील त्याचा फायदा झाला पाहिजे अशी माझी धारणा आहे. लेखक, दिग्दर्शक, कलाकार मंडळीना सिनेमात कोणत्या गोष्टींची गरज आहे याची निर्मात्यांनी नेमकी दखल घेतली पाहिजे. ‘कॅलेंडर गर्ल्स’ च्या मी देखील बऱ्याच गोष्ठी मधूर कडून नव्याने समजावून घेतल्या.

यशस्वी उद्योजक महिलांच्या यादीत तुमचे नाव आग्रहाने घेतले जाते तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
आजही मी बऱ्याच गोष्टी नव्याने शिकत आहे. त्यामुळे सल्ला देण्या इतपत मी कोणी मोठी नाही. मी पडद्याआड राहून काम करण अधिक पसंत करते. घर, व्यवसाय आम्ही सुरु केलेली संकल्प प्रतिष्ठान संस्था सगळ्यात माझं सम समान लक्ष असतं घरच्या जेवणात कोणती भाजी असावी माझी मुलं शाळा कॉलेज मध्ये व्यवस्थित जात आहेत ना, त्यांची त्यांची आवड निवड सगळ्याकडे माझं बारीक नजर असतं. हे मी आनंदाने करते  त्याचप्रमाणे निर्माती म्हणून देखील संकल्प प्रतिष्ठानने जेव्हा पहिल्यांदा दहीहंडी उभारण्याचा संकल्प केला तेव्हा लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्या गोष्टींची जबाबदारी मी आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने घेतली होती. मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकासाठी काही तरी केलं पाहिजे.

गेली अनेक वर्ष सिनेक्षेत्राशी  निगडीत आहात निर्माती व्यतिरिक्त इतर कोणती जबाबदारी घ्यायला आवडेल का? (दिग्दर्शिका / लेखिका)
सध्या तरी मी स्वतः काही वेगळं करण्याच्या प्रयत्नात नाही. निर्माती म्हणूनच अजून चांगला प्रयत्न करेन.

असा एखादा विषय आहे का ज्यावर आधारित सिनेमाची निर्मिती करण्याची तुमची प्रबळ इच्छा आहे?
जब्बार पटेल दिग्दर्शित अभिनेत्री स्मिता पाटील यांचा उंबरठा सिनेमा मला खरंच खूप प्रभावित करणारा ठरला. त्यामुळे सिनेमाचा विषय महिलांशी संबंधित असेल यात दुमत नाही. मात्र नक्कीच तो आजच्या जगाशी पिढीशी आणि तरुणाईशी रिलेट करणारा असेल. याची सुरवात मी माझ्या घरापासून केली आहे. माझ्या दोन्ही मुलीना रोल मॉडेल मानते. रोज काहीतरी त्यांच्याकडून शिकायला मिळतं. कॅलेंडर गर्ल पाहताना तुम्हाला नक्की याचा प्रत्यय येईल.

आपल्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे यंदाची नवरात्री कशी साजरी केली जाणार आहे?

नवरात्री शक्यतो आम्ही घरातील मंडळीच एकत्र साजरी करतो. संकल्प पप्रतिष्ठान तर्फे वर्षभर या ना त्या कारणाने बरीच समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. ते म्हणतात ना, स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही तेच खरं. संकल्प प्रतिष्ठानची घडी बसवण्यासाठी जवळ पास ९ वर्ष मी फिल्म मेकिंग मधून ब्रेक घेतला होता. सध्या आम्ही १४ हजार जेष्ठ नागरिक दत्तक घेतले आहेत. त्यांची सर्वोतोपरी काळजी संस्थे तर्फे घेतली जाते. १२ डॉक्टरांची एक टीम आम्ही इथेच ठेवली आहे जी त्याची वेळोवेळी तपासणी करेल. ११ ते १५ च्या  महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या २ हजार पुस्तकांची बँक आम्ही सज्ज ठेवली आहे. गरजू विध्यार्थ्यांना त्यातून मदत केली जाते. नुकतंच आम्ही २०० मोतीबिंदूची ऑपरेशन यशस्वीरित्या करवून आणली. त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही उपक्रम हाती घेतले आहे.


 

Amruta Khanvilkar @ Jhalak Dikhhla Jaa Reloaded

मराठ मोळी अमृताचा झलक मध्ये गेस्ट अपिअर्न्स 
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडाॅल अमृता खानविलकर नुकतीच नच बलिये ७ची विजेती ठरली. अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे.  गोलमाल या चित्रपटातून आपल्या करिअर ची सुरवात करणाऱ्या अमृताला नटरंग चित्रपटातल्या जाऊ द्या न घरी लावणीतून  प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्यावर आधारित असलेल्या अनेक डान्स रिआलिटी शो मधून आपल्याला तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली. नच बलिये ७ मध्येही तिने स्वतः तर नृत्यावर विशेष मेहनत घेतली पण त्यासोबतच ती हिमांशूची स्ट्रीक टीचर झाली. आणि आता पुन्हा एकदा झलक दिख ला जा या डान्स रिआलिटी शो मधून भेटणार आहे. झलकच्या वाईल्ड कार्ड एंट्री मधून तीन का तडका या कन्सेप्टच्याआधारे सेलिब्रेटी गेस्ट एन्ट्री होणार आहे. आणि  सेलिब्रेटी गेस्ट  म्हणून अमृता खानविलकर स्पर्धक नेहा मर्दा आणि कोरीग्राफर रजित यांच्यासोबत परफॉर्म करणार आहे. बेहेने दे या  रावण सिनेमातल्या गाण्यावरती हे तिघे नृत्य करणार असून तीन नद्यांचा संगम या नृत्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.झलक दिखला जा हा भाग आपल्याला येत्या शनिवारी ९  वाजता दाखवण्यात येणार आहे.  येत्या वर्षात आपल्याला अमृताचे बिग बजेट सिनेमे पाहता येणार आहेत. त्यापैकी अमृता कट्यार काळजात, वन वे तिकीट, ऑटोग्राफ या सिनेमांमध्ये आपण अमृता पाहणार आहोत.
 “मला झलक मध्ये सेलिब्रेटी गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं त्याचा मला खूप आनंद होत आहे. आमचा परफॉरमन्स चांगला व्हावा यासाठी नेहा, रजित आणि मी देखील खूप मेहनत घेतली आहे. ”  – अमृता खानविलकर

 Amruta Khanvilkar Jhalak Dikhla Ja Reloaded Photo Gallery

 

Dagadi Chaawl Trailer Event Photos

दगडी चाळ या सिनेमाचा ट्रेलर सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी  सिनेमाचे निर्माते संगीता अहिर, क्रिशना अहिर (मंगलमुर्ती फिल्म्स ), अमोल काळे ( साई पूजा फिल्म्स) , दिग्दर्शक चंद्रकांत कणसे, मकरंद देशपांडे,  अंकुश चौधरी, पूजा सावंत, आणि संगीत दिग्दर्शक अमितराज उपस्थित होते.


Dagadi Chaawl Movie Trailer Event Pics


 

Dagadi Chaawl Marathi Movie Official Trailer

Here’s the official trailer of ‘Daagdi Chaawl’, the extraordinary tale of a common man fighting against all odds to survive. The film is directed by Chandrakant Kanse, produced by Amol Kale & Suresh B.Sawant and presented by ManglMurti Films is set to release on 2nd October 2015.


 

 


 

Bappa Morya Re – Marathi Song – Vaishali Samant, Avadhoot Gupte, Swapnil Bandodkar

Singers ; Vaishali Samant, Avadhoot Gupte, Swapnil Bandodkar. Composer : Nilesh Moharir Lyrics : Ashwini Shende Video : Sagarika Das Label : Sagarika Music


 


 

Latest On MegaMarathi.Com

Marathi Artists

You May Like This