स्वप्नीलच्या वाढदिवशी ‘फ्रेड्स’ सिनेमाचे पोस्टर लाँच
अभिनेता स्वप्नील जोशीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ‘फ्रेड्स’ या आगामी सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आलं. स्वप्नीलचा बर्थ डे ‘फ्रेड्स’सिनेमाच्या टीमने मोठ्या उत्साहात साजरा केला. लवकरच हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात स्वप्नील जोशी आणि सचित पाटील यांची केमिस्ट्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दक्षिण सिनेमाचे प्रसिद्ध दिग्दर्शक आर. मधेश यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर् शनातून मराठी सिनेमात पदार्पण केलं आहे. ब्ल्यू आय आर्ट्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे संजय केलापूरे, मनीष चंदा, प्रेम व्यास निर्माते असून जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान देखील सहभागी आहेत.
Poster And Photos :