‘या’ मराठी चित्रपटाचा चक्क इंस्टाग्रामवर नवा फिल्टर, दणक्यात सुरू आहेत प्रमोशन्स !!

445

सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वच मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करताना दिसत आहेत. अनेक विविध विषय हाताळले त्या विषयावर चित्रपट तयार केले जातात पण त्यात सोबत त्या चित्रपटांचे प्रमोशन देखील मोठ्या प्रमाणावर आणि प्रभावीरीत्या केले जाते. सध्या अशाच एका तुफान चित्रपटाचा दणकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

मुंबईतील गॅंगवॉरमधील सर्वात मोठे नाव म्हणजे ‘अरुण गुलाब गवळी’ उर्फ ‘डॅडी’. त्यांच्या ‘दगडी चाळी’वर आधारित ‘दगडी चाळ’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. ज्याप्रमाणे डॅडींनी अवघ्या मुंबईवर राज्य केले तसेच या चित्रपटानेही अवघ्या महाराष्ट्रावर राज्य केले. आता याच चित्रपटाचा पुढचा सिक्वल ‘दगडी चाळ २’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टरचे अनावरण ‘रिअल डॅडीं’च्या हस्ते दगडी चाळीत झाले असून ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित ‘दगडी चाळ २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले असून रत्नकांत जगताप कार्यकारी निर्माता आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MegaMarathi.Com (@megamarathi)


येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन कलाकारांकडून होताना दिसत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत, टीव्ही मुलाखती देत सोशल मीडिया यांचा वापर करून या चित्रपटाचं प्रमोशन होत आहे. या चित्रपटाचा कमी-अधिक प्रमाणात एक अनोखा प्रकार या वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे या चित्रपटाचा नाव असलेला इंस्टाग्राम वर एक फिल्टर तयार करण्यात आला आहे.

हा फिल्टर ओपन करून कॅमेरा समोर धरल्यावर आपल्या डोक्यावर एक पांढरी टोपी येते आणि आणि डाव्या बाजूला या चित्रपटाचं नाव म्हणजे दगडी चाळ २ असं लाल अक्षरात लिहून येतं तर सोबतच वरती ‘चुकीला माफी नाही’ हे वाक्य लिहून येतं आणि बॅकग्राउंडला म्युझिक सुरु आहे. चित्रपटातील कलाकार अंकुश चौधरी, पूजा सावंत, मकरंद देशपांडे आणि या चित्रपटाच्या dc2thefilm या पेज वरून यांनी हा फिल्टर असलेला व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.

‘दगडी चाळ २’मध्ये आपल्याला सूर्या आणि डॅडी यांच्यातील एक वेगळे नाते पाहायला मिळणार आहे. एकेकाळी डॅडींचा उजवा हात असणारा सूर्या आता त्याच्या कुटुंबासोबत गॅंगवॉरच्या विळख्यातून बाहेर पडून एक साधं सोप्पं आयुष्य जगताना दिसत आहे. मात्र डॅडी आणि सूर्या यांच्यात असे काही घडले आहे, ज्याने सूर्या डॅडींचा तिरस्कार करू लागला आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे, त्यांच्या नात्यात कडवटपणा का आला आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !