Cinderella Vs Dilwale

430
L To R - Sameer Dixit - Distributor, Kiran Nakti - Director
L To R - Sameer Dixit - Distributor, Kiran Nakti - Director

सिंड्रेला सिनेमाविरोधात शाहरुखचा “दिलवाले”?

सलग दोन अठवडे “सिंड्रेला” हा मराठी सिनेमा अवघ्या राज्यभरात दर्दी प्रेक्षकांचं रसिकमन जिंकून घेऊन अव्वल स्थानावर विराजमान होऊ पाहत असतानाच हिंदीतल्या बड्या कलाकारांची निर्मिती असलेले सिनेमेच आता सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आड येऊ पाहत आहेत. सलग दोन आठवडे मराठीत चांगलीच गर्दी खेचलेल्या सिंड्रेला सिनेमाला थिअटर न मिळू देण्याच कारस्थान हिंदीतले येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारे सिनेमे करीत असल्याच उघड झाल आहे. ४ डिसेंबर रोजी राज्यभरातल्या ११० चित्रपटगृहातून ९७३  शोजच्या माध्यमातून झळकलेल्या सिंड्रेलाला आता राज्यभरात तर सोडाच पण मुंबई – ठाण्यातही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी थिअटर देखील न मिळाल्याने “सिंड्रेला विरुद्ध शाहरुखचा दिलवाले” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मल्टीप्लेक्स थिअटरमध्ये एकापेक्षा अधिक स्क्रीन असूनही या साऱ्या स्क्रीन हिंदीलाच देण्याचा मानस थिअटर मालकांचा या आठवड्यात पाहायला मिळत आहे. तर, सिंगल स्क्रीन थिअटरला हिंदीच्या तोडीच समान भाड भरण्याची तयारी सिंड्रेलाने  दाखवून देखील सिनेमाला थिअटर देत नसल्याच स्पष्ट झाले आहे. या साऱ्या मगच  कारण आहे, हिंदीतले दोन बडे सिनेमे याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांसाठी थिअटरला अधिकाधिक शोज मिळवून देण्याच्या उद्देशाने सिंड्रेला सिनेमाला डावललं जात असल्याच समोर आल आहे.

मराठी सिनेमांची उंची वाढवण्याच काम सिंड्रेला सिनेमा करू पाहत असतानाच मराठीची हि गळचेपी हिंदी सिनेमांनी केल्याने सिंड्रेलाच्या प्रदर्शनासाठी या पुढे हा लढा तीव्र करण्याचा आमचा मानस असून या पुढे हा सिनेमा राज्यभरात सर्वत्र पोहोचवण्याच काम आम्ही करणार आहोत. या प्रदर्शनाचे स्वरूप आम्ही आखले असून या सिनेमाचा मुख्य प्रेक्षक असलेल्या शाळेतल्या मुलांपर्यंत आता हा सिनेमा थिअटरविना पोहोचवण्याच नवा अभिनव उपक्रम आम्ही आता हाती घेतला आहे. हा अभिनव उपक्रम “ शाळा तिथे सिंड्रेला” या नावाने आम्ही शालाशालांत पोहचवण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.


Photo :