& Jara Hatake – Upcoming Marathi Movie

959
and jara hatke team 1

‘नव्या युगाची & जरा हटके गोष्ट’

प्रेक्षकांना सहज आपलंसं करणारं आणि त्यांची अचूक नसओळखणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक रवि जाधव आपल्या चांगलंचपरीचयाचं आहे. त्यांची प्रस्तुती असलेल्या  आगामी  ‘ & जरा हटके’ या सिनेमाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. आजच्या मॉडर्न जगातनात्यामध्ये बदलत चाललेली भावनिकता आणि त्यातून दोनजनरेशनमध्ये घातलेली सांगड या सिनेमात जरा हटके पद्धतीनेमांडली आहे. ‘&’ हे अक्षर मुळात दोन भिन्न  गोष्टी जोडणारे असूननात्यांना कम्प्लीटनेस मिळवून देणारे आहे. तोच कम्प्लीटनेस हासिनेमा पाहताना प्रेक्षक नक्कीच अनुभवतील. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नव्या युगातील वेगाने बदलतअसलेल्या नात्यांतील गुंतागुंत जरा हटके पद्धतीने सादर करण्याचाआम्ही प्रयत्न केला आहे. नुकताच या सिनेमाचा लोगो अनेकमान्यवरांनी ट्विट करुन तो अतिशय वेगळा व नाविन्यपुर्ण असल्याचीपोच पावती दिल्याची माहिती रवि जाधव यांनी दिली. इरॉसइंटरनॅशनल आणि रवि जाधव यांची सहनिर्मिती असलेल्या ‘ & जराहटके’ या सिनेमाचे लेखन मिताली जोशीने केले असून दिग्दर्शनप्रकाश कुंटे यांनी केल आहे.


 Logos And Photos