यंदाच्या “साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल”मध्ये “सिंड्रेला”ची निवड!!
अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी ‘सिंड्रेला’ सिनेमाची अधिकृत निवड यंदाच्या “साऊथ कॅरोलिना अंडरग्राउंड फिल्म फेस्टिवल” (SCUFF) मध्ये करण्यात आली आहे.१४ नोव्हेंबर २०१५ रोजी चार्लस्टन, साऊथ कॅरोलिना येथे हा फेस्टिवल सुरु होणार आहे.‘सिंड्रेला’ सिनेमाच्या निमित्ताने अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांनी सिने-दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे.
“सिंड्रेला” या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. एकंदरीत या सिनेमाची कथा ही आपल्या सर्वांच्या जवळची असून ही “खरी कथा की परी कथा” हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पहावा लागणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Photo Gallery :