विशाल देवरुखकरच केलेंडर हाऊसफुल्ल !

687

बालनाट्य, एकांकिका, सहदिग्दर्शक ते मराठीतील एक दर्जेदार दिग्दर्शक म्हणून ख्याती मिळवलेला विशाल देवरुखकर. हा सिनेदिग्दर्शक फार मेहनत आणि कठोर अश्या परिश्रमामुळे आज मराठी चित्रपट सृष्टीत तरुणाईला भावेल अशा चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. धारावीत वाढलेला विशाल देवरुखकर याने तब्ब्ल २० चित्रपटाचे सहदिग्दर्शन केले आहे. सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची असताना चित्रपट क्षेत्राशी जुळवत नोकरी सुद्धा केली, नंतर २००४ पासून विशाल पूर्णपणे चित्रपटसृष्टीत कार्यरत झाला.चित्रपट क्षेत्रात एक वेगळा दृष्टीकोन असलेला दिग्दर्शक म्हणून विशाल देवरुखकरची आज ओळख झाली आहे. आपल्या चित्रपटातून वेगळा संदेश देत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर विशालच्या भर आहे. बॉईज या मनोरंजन आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटासोबत विशालने स्वतःच्या दिग्दर्शनाची कारकीर्द सुरु केली. बॉईज या चित्रपटाच्या सिरींजमधील पहिल्या दोन भागांच्या भरगोस यशानंतर त्याने गर्ल्स या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच असे भरगोस यश मिळवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणून विशालची आता गणना होऊ लागली असून. मध्यमवर्गीय कुटुंबातून आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा विशाल या वर्षी अनेक दर्जेदार आणि उत्तम कलाकृती घेऊन येत आहे.
‘लव्ह इन धारावी’ या बरोबर ‘नयनसुख’ या चित्रपटाच्या कामात तो व्यस्त आहे. ‘धुक्यात धोका’ या नव्या वेबसिरीजवर सुद्धा तो काम करत असून त्याच्या बॉईज चित्रपटाच्या श्रुंखलेतील ‘बॉईज ३’ या आगामी चित्रपटाची सुद्धा चर्चा आहे. या कलाकृतींच्या निमिताने विशाल या वर्षभरात प्रेक्षकांसाठी एक मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार असून प्रेक्षकही त्याची वाट बघत आहेत.