“ठण ठण गोपाळ” सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा दिमाखात संपन्न!!
दक्षिणात्य युवा अभिनेता कार्तिक शेट्टी याचे दिग्दर्शन असलेल्या “ठण ठण गोपाळ” या मराठी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. सेन्सोर बोर्डाचे चेअरमन पहलाज निहलानी यांच्या शुभहस्ते या सिनेमाचा ट्रेलर लौंच करण्यात आला तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते या सिनेमाचे म्युझिक लॉंन्च करण्यात आले. याप्रसंगी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञ आणि अन्य मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. ओम गणेश प्रॉडक्शनच्या सिद्धांत शेट्टी, निधी शेट्टी, श्रीनिवास शिंदे, राहुल पोटे आणि विजय शेट्टी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे
“ठण ठण गोपाळ” या सिनेमाची कथा ही दृष्टी नसलेल्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची आहे. या मुलाची भेट एका वारली चित्रकाराशी होते आणि त्यांची उत्तम मैत्री जमते व पुढे या मुलाच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळते त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.
सवर्प्रथम मी निर्मात्यांचे आभार मानू इच्छितो कि, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हा सिनेमा बनविण्याची संधी दिली. कलाकारांनी मला उत्तम सहकार्य केले. एक वेगळा विषय आहे मला खात्री आहे कि हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा आशा सिनेमाचे दिग्दर्शक कार्तिक शेट्टी यांनी व्यक्त केली.
मी स्वतः सिनेमा पाहिला आहे. कार्तिकचा जरी हा पहिला मराठी सिनेमा असला तरी त्याने उत्तम टेकिंग घेतले आहेत हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम झाला असून विवेकच्या अभिनयाने तर कमालीची जादू केली आहे असे मत याप्रसंगी अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या टीमला दिलेल्या शुभेच्छांची एक व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. ज्यामध्ये मी या सिनेमाचा स्पेशल शो पाहिला तेव्हा मला या सिनेमाचा विषय आवडला असल्याचे नमूद केले होते.
“ठण ठण गोपाळ” सिनेमाची कथा कार्तिक शेट्टी याची असून पटकथा कार्तिक शेट्टी, श्रीनिवास शिंदे आणि राहुल पोटे यांची तर संवाद वैभव परब यांचे आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. अदिती जहागीरदार यांनी लिहिलेल्या दोन गीतांना अमित शेट्टे या नवोदित संगीतकाराचे संगीत लाभले असून ही गाणी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत तर कॅमेरामन म्हणून मंजुनाथ नायक यांनी काम पाहिले आहे.
“ठण ठण गोपाळ” हा एका व्वेग्ल्या धाटणीचा सिनेमा येत्या ३० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Than Than Gopal Movie Music And First Look Launch Photos