One Way Ticket | Marathi Movie Muhurat with team and guest

1172
फॉरेनवारी करणार ‘वन वे तिकीट’ 
मराठी सिनेमाचा प्राण असलेली कथा आणि कलाकारांचा अभिनय चित्रपटाला नेहमीच वेगळ्या उंचीवर ठेवणारा असतो. सिनेमाची पार्श्वभूमी कोणतीही असो प्रेक्षकांच्या लेखी तो अव्वल दर्जाचा सिनेमाच असतो. मात्र आता मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपले पंख पसरले आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे ‘वन वे तिकीट’ हा सिनेमा. एप्रिल २०१६ गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीला  नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारा आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण इटली, फ्रांस, स्पेन या नयन रम्य ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे  क्रुझवर चित्रित केला जाणारा  हा पहिला मराठी सिनेमा असेल. केएनसी प्रॉडक्शनचे कमल नथानी आणि म्हाळसा एंटरटेनमेंट सुरेश पै यांची निर्मिती असलेला ‘वन वे तिकीट’ येत्या वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमा असेल यात शंका नाही. ‘क्लासमेट’ सिनेमाच्या मोठ्या यशानंतर म्हाळसा एंटरटेनमेंटची ही अजून एक झेप आहे. त्यांना ‘वन वे तिकीट’ सिनेमाच्या निर्मितीत मेकब्रँडचे कोमल उनावणे, विक्रांत स्टुडियोचे सुभाष काळे, क्लिक फ्लिक फिल्म्सचे निनाद बत्तीन या हिंदी चित्रपट निर्मात्यांची उत्तम साथ मिळाली आहे. मराठी सिनेमाचा वाढता ग्रॅंजर पाहून  ‘वन वे तिकीट’ सिनेमा माईल स्टोन ठरेल. कमल नथानी यांनी यापूर्वी अनेक हिंदी सिनेमे केले आहे. त्यांचा मराठी चित्रपट दिग्दर्शन  आणि निर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे. तरुणाईचे आयडल असतील अशी तगडीस्टार कास्ट या सिनेमात आहे. अभिनेता सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी आणि नेहा महाजन यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. मालिकेची चौकट ओलांडत मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी शशांक केतकर सज्ज झालाय. कथा दिवेश नथानी, पटकथा अमोल शेटगे, छायालेखल रुपंग  या सिनेमाची कथा पाच व्यक्तीरेखांच्या अवती भवती फिरणारी असून नशीब आणि ध्येयाची उत्तम सांगड घातली आहे. नुकताच या सिनेमाचे ‘बेफिकीर’ हे गाणं अंधेरीतील एम्पायर स्टुडीयो मध्ये रेकॉर्ड करून सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. ‘जोकर’, ‘हार्टलेस’ या सिनेमाचे संगीत दिग्दर्शन करणारे गौरव डगावकर यांनी या सिनेमाचं देखील संगीत दिग्दर्शन केलं असून ‘बेफिकर’ हे गीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं आहे. अपेक्षा दांडेकर आणि रोहित राऊत या तरुण गायकांनी गायलेलं हे रोमॅंटिक फन साँग नक्कीच प्रेक्षकांना भुरळ घालेल. या सिनेमाचा मुहूर्त एम्पायर स्टुडियोची मुहूर्तमेढ नव्याने भरणारा ठरेल.  


 One Way Ticket – Marathi Movie Photo Gallery