सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु आणि सिद्धार्थच्या नात्याचा दृढ होणार बंध !

1326
Anu and Siddharth's Relationship Gets A Lovely Turn in He Man Baware

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थच्या आयुष्याला आता वेगळे वळण मिळणार आहे… अनु आणि सिद्धार्थचे लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. या दोघांच्या आयुष्यात खुप अडचणी आल्या पण त्या सगळ्यांना अनु – सिध्दार्थ खंबीरपणे सामोरे गेले. सान्वीच्या कटकारस्थानाला उत्तर दिले. हे सगळे घडत असताना सिध्दार्थचे अनुवर असलेले प्रेम वाढतच गेले पण ज्या गोष्टीची वाट प्रेक्षक आणि सिध्दार्थ बघत होते ते शेवटी घडले… प्रेम जगातील अत्यंत सुंदर भावना आहे कधी ते एका नजरेत होत कधी सहवासातून होते… सान्वीमुळे अनु आणि सिध्दार्थमध्ये काही काळासाठी दुरावा आला होता आणि त्या दरम्यान अनुला तिच्या प्रेमाबद्दलची जाणीव होण्यास सुरूवात झाली.

Anu and Siddharth Love

मालिकेमध्ये नुकतीच अनुने तिच्या प्रेमाची कबुली सिध्दार्थला दिली आहे… सिध्दार्थ आणि अनुच म्हणालं तर जरा वेगळं आहे, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणी, अनेक गैरसमज आले… पण आता या दोघांचे नाते अजून दृढ होणार आहे.

 

anu and siddharth
Pic Credit – Colors Marathi

अनु – सिध्दार्थच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाच्या या सरी कुठलं नवं वळणं घेऊन येतील हे कळेलच. तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.