चिल्लर पार्टी या सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात करण्याऱ्या नमन जैनचा वक्रतुंड महाकाय हा आगामी सिनेमा २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.पुनर्वसु नाईक यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने नमन जैन याने ठाण्यातील प्रख्यात डॉ सुहास कुलकर्णी यांची भेट घेतली. डॉ सुहास हे पर्यावरणाला हानी होऊ नये याकरिता गेल्या १२ वर्षांपासून घरच्या घरी शाडू गणपती बनवून त्याचे घरगुती पद्धतीने विसर्जन करीत आहेत. नमनने यावेळी शाडूचा गणपती बनवण्याची मजा घेतली. शाडूचा गणपती बनविताना नमन जैन आणि डॉ सुहास कुलकर्णी .
Photo Gallery