मि. अँड मिसेस सदाचारी लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला
इंडियन फिल्मस स्टुडियोज निर्मित ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमासाठी निर्माता आणिदिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका आशिष वाघ बजावत आहेत. मुळात कॉर्पोरेट क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आशिष यांनी गेल्या दहावर्षात सुमारे ३०० सिनेमांची वितरीत केली आहे. आशिष वाघ आणि उत्पल आचार्य यांची केमिस्ट्री सगळ्याच बाबतीत उत्तम आहे. याजोडगोळीने एमएमएस या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. कुशाग्र दिग्दर्शकाचा अनुभव असलेल्या आशिषवाघ यांनी ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे तर उत्पल आचार्य यांनी देखील निर्मितीची धुरा सांभाळली आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीत चित्रित होत असलेल्या या सिनेमाचा काही भाग मॉरिशियसमध्ये देखील शूट झाला आहेत. अतिशयनयनरम्य ठिकाणी सिनेमाचं भारताबाहेर शुटींग झालं आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोमॅंटिक,कॉमेडी आणि एक्शनचा उत्तम मेळ असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा टीझर ‘तू ही रे’ सिनेमासोबत पाहता येणार आहेत. ४डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात पहिल्यांदा झळकलेली वैभव तत्ववादी आणिप्रार्थना बेहरे यांची जोडी या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र येत असली तरीही त्यांच्या अभिनयाची वेगळीच छटा असलेल्या भूमिकापाहायला मिळणार आहे. त्यांची जोडी यंदा काय कमाल दाखवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अभिनेता मोहन जोशी, विजयआंदळकर, उमा सरदेशमुख, उदय नेने, सुमुखी पेंडसे, प्रसाद जावडे अशा अप्रतिम कलाकारांची फौज चित्रपटात सुरु होणार आहे. यासिनेमाचं कला दिग्दर्शन महेश साळगावकर, छायादिग्दर्शन बालाजी रंघा, नृत्य दिग्दर्शन एफ.ए.खान आणि सुभाषनकाशे, संकलन मयूर हरदास, रंगभूषा महेश बराटे या अव्वल काम करणाऱ्या कलाकरांची फळी सिनेमासाठी काम करत आहे.त्याचबरोबर ओमकार मंगेश दत्त, गुरु ठाकूर आणि प्रणीत कुलकर्णी यांच्या अप्रतिम गीतांना पंकज पडघन आणि वी. हरीक्रिशननयांनी अफलातून संगीत दिल आहे. सिनेमाची धमाकेदार पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे यांची आहे. येत्या वर्षात प्रेक्षकांच्याभेटीला येणारा हा सिनेमा एंटरटेनमेंटची उत्तम मेजवानी असेल.
Mr & MRS Sadachari Photos :