निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. गायक नकाश अजीज, अरमान मलिक ,अवधूत गुप्ते ,रितिका निषाद ,देवश्री मनोहर ,कृष्णा बोंगाणे आहे.
श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.
Home Videos Movie Trailers निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या ‘नेबर्स’ चित्रपटाचा संगीत...