अरे.. किती मोठा झाला हा, घरी आलेल्या पाहुण्यांच्या तोंडून हे वाक्य आपण सर्रास ऐकत आलो आहोत. त्यांचं हे बोलणं ऐकून त्या मुलाच्या मनात मात्र खूप विचार येत राहतात.
मात्र खरं तर बऱ्याच दिवसांनी एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुम्हा आम्हा सगळ्यांची अशीच काहीशी प्रतिक्रिया असते. बऱ्याच दिवसांनी एखाद्याला पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकीत होतो. अनेकदा तर आपल्याला त्याला नीट ओळखताही येत नाही. क्रिकेटर्सच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. नाव आणि प्रसिद्धी मिळण्याआधी आपले क्रिकेटर्स सर्वसामान्यांप्रमाणेच आयुष्य जगत होते. तेव्हा त्यांची लाईफस्टाईल देखील वेगळी होती. या क्रिकेटर्सच्या त्यावेळच्या आणि आताच्या लूकमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जेणेकरून त्यावेळचे फोटो बघून तुम्ही त्यांना ओळखूही शकणार नाही.. चला तर मग तूम्ही स्वतच बघा तूमच्या आवडत्या क्रिकेटर्सचा बदललेला लुक..
महेंद्रसिंग धोनी-
टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेला धोनी तरुणपणात काहीसा असा दिसत होता. गेल्या काही काळात धोनीच्या लुकमध्ये खूपच बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात धोनीच्या लॉंग हेअर स्टाईलवर लाखो चाहते फिदा होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यानं ही आपली हेअर स्टाईल बदलली.
सचिन तेंडुलकर-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या करियरची सुरुवात करण्याआधी असा दिसत होता. सचिननं आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक किर्तीमान रचले आहेत. आज आघाडीवर असलेले क्रिकेटर्स तर त्याच्याकडे बघून क्रिकेट खेळायला लागल्याचे आवर्जून सांगताना दिसतात. वीरेंद्र सेहवागचा जुना फोटो पाहून तुम्ही त्याला ओळखुच शकणार नाही,
वीरेंद्र सेहवाग-
भारताचा माजी सलामीवीर आणि कॉमेंटेटर तसेच क्रिकेट व्यतिरिक्त आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत असलेला वीरू सुरुवातीला असा दिसायचा. खरंच त्यांचा हा फोटो बघून कोणीही मान्य करणार नाही की हा वीरेंद्र सेहवाग आहे.
शिखर धवन-
गब्बर या आपल्या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा सलामीवीर शिखर धवन करियरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये असा काहीसा दिसत होता. त्याच्या तेव्हा आणि आताच्या फोटोत फक्त दाढी- मिशीचा फरक दिसुन येतोय.
विराट कोहली-
टीम इंडियाचा कर्णधार आणि रणमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीचा त्याच्या जुन्या फोटोंमधील लुक काहीसा वेगळाच दिसतोय. अलीकडच्या काळात त्यानं आपल्या लुकमध्ये खूप बदल केले आहेत. प्रसिद्धी मिळाल्यानंतर माणसात किती बदल होतात हे विराटचे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर आपल्याला समजेल.
रविंद्र जडेजा-
भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि सर जडेजा म्हणून ओळखला जाणारा रवींद्र जडेजा सुरुवातीच्या दिवसात असा दिसायचा. एखाद्या साधारण तरुणाप्रमाणे दिसणाऱ्या जडेज्याच्या चेहऱ्यावर आता कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळतो. भज्जी आणि युवराज यांचे जुने फोटो नक्की पाहा-
हरभजन सिंग-
भज्जी या नावाने परिचित असलेला हरभजनसिंग सध्या क्रिकेटपासून दूर आहे. असं असलं तरी भज्जीने खूप कमी वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी भज्जीचा लुक काहीसा असा होता.
युवराज सिंग-
कॅन्सर सारख्या आजारावर मात करत त्याच जोशात मैदानात दाखल होवून पुन्हा मैदान गाजवणारा जगातील एकमेव खेळाडू म्हणजे युवराज सिंग. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या युवीची कारकीर्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. सुरुवातीला युवीचा लुक अशा प्रकारचा होता.
राहुल द्रविड-
द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यातील फरक तूमच्या सहज लक्षात येईल. त्यांनं भारतीय क्रिकेट संघाला दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं आहे.
गौतम गंभीर-
लहानपणापासून क्रिकेटर बनण्याचं स्वप्न गौतम गंभीरने पाहिलं होतं. त्याच्या या जुन्या फोटोत त्याची ब्याट पकडण्याची स्टाईल त्याचं क्रिकेटवरचं प्रेम सांगायला पुरेशी आहे. तूम्हाला सुद्धा अशा एखाद्या खेळाडूविषयी माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा..