दगडी चाळीतील थरार लवकरच मोठ्या पडद्यावर
१९९६ ची मुंबई… मुंबईतील तेव्हाची परिस्थिती रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्या दिवसात गाजलेली’दगडी चाळ’ तिच्या नावाचा दरारा आणि रुतबा काही औरच होता… याच दगडी चाळीवर आधारित ‘दगडी चाळ’ हा सिनेमा लवकरचप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याकाळी ज्यांनी दगडी चाळीचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या मनात त्या आठवणीनेहमीसाठी घर करून बसल्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स आणि साई पूजा फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगलमूर्ती फिल्म्सने यापूर्वी देखील बऱ्याच हिंदी सिनेमांची निर्मिती केली असून मराठी चित्रपट निर्मितीचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनीही या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शन करण्याचे शिवधनुष्य हाती घेतलंय. हासिनेमा २ ऑंक्टोबर २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.मराठी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत,संजय खापरे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात धडाकेबाज आणि जोशपूर्ण असं गणपती बाप्पावर चित्रित केलेलं गाणंदेखील आहे. गाणं ऐकताच क्षणी पाय थिरकतील असं दमदार संगीत देणारे अमितराज आणि गायक आदर्श शिंदे या जोडगोळीला ऐकण्याची संधी दगडी चाळच्या निमित्ताने पुन्हा मिळणार आहे. एकूणच मराठीतील हा पहिला वाहिला स्टाईलिश ‘दगडी चाळ’प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल … त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पहात होते. त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गॅंग्ज आणि गॅंगवॉर्सच्या सर्कल मध्ये अडकलेली मुंबई…. प्रतिकूल परिस्थितीत अपघाताने वाममार्गात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या आयुष्याची कथा सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत दगडी चाळ हा पहिला वाहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही… या चित्रपटाच केंद्रबिंदू गॅंगवॉर नसून त्यातील हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा आहे. त्यामुळे यंगस्टर्ससाठी एक पर्वणीच असेल.
Dagadi Chaawl Photos/ Stills: