Lord Of Shingnapur (2016) | Marathi Movie

726
Lord Of Shingnapur Marathi Movie Poster

Movie : Lord Of Shingnapur (2016)

  • Star Casts : Milind Gunaji, Sudhir Dalvi, Ashutosh Kulkarni, Vaibhavi ,Manoj Joshi,Varsha Usgaonkar,Rahul Mahajan,Yashodhan Rana,Aniket Kelkar,Pankaj Vishnu.
  • Director : Raj Rathod
  • Writter : Raj Rathod
  • Screenplay : Ajit Devle
  • Produced By : Rathod Films
  • Studio : Rathod Films
  • Genre : Devotional
  • Release Date : 08 January 2016.

Synopsis :

जेव्हा जेव्हा शानिदेवाची वक्रदृष्टी कुठल्या न कुठल्या मनुष्य किंवा देवावर पड़ते तेव्हा तेव्हा त्यांची साडेसाती
सुरु होते. असा मानवाचा समज असतो त्यामुळे तो शनीदेवा पासून दुर पळत असतो. त्यांना हे माहीत नसत की शनीदेव खुप दयाळू व कृपाळू आहेत. ते आपल्या भक्तांना दुःख आणि सकंटातुन बाहेर काढतात.

याचेच उदाहरण आम्ही “लार्ड ऑफ़ शिंगणापुर” या कथेतुन मांडले आहे.
नेहा (वैभवी) ही एक अनाथ मुलगी आहे.आणि रोहीत (आशुतोश) हा श्रीमंत परिवारातील एकुलता एक मुलगा
आहे. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम आहे. पण रोहीतच्या वडिलांना (मनोज जोशी) हे मान्य नाही. हे मान्य नाही.
कारण त्यांना अनाथ मुलगी आपली सुन म्हणून नको होती व ते लग्नाला नकार देतात. परंतु आईचा (वर्षा
उसगावकर) त्याला पाठिंबा असतो.
राहुल चा जीवलग मीत्र (राहुल महाजन) त्यांचे लग्न लावून देतो. रोहीत आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी
घरी येतो. परंतु वडील त्यांना पुन्हा घराबाहेर काढतात यानंतर रोहीतच्या गाडीचा अपघात होतो आणि ते
एकमेकांपासून वेगळे होतात. रोहीत नदीतून वाहत किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडतो. जवळील आश्रमातील
सेविकांना तो सापडतो. त्या रोहीतला आश्रमात घेवुन जातात. रोहीत शुद्धीवर येतो तेव्हा त्याची स्मृती गेलेली
असते. त्याला मागील काहीच आठवत नाही.
दुसरीकडे नेहा एका जंगलात हरवते. ती रोहीतला शोधण्याचा खुप प्रयत्न करते. तेव्हा तिची गाठ साधुमहाराज
म्हणजेच रूप बदलून आलेले आपले शनी महाराज (मिलींद गुणाजी) यांच्याशी होते. ते तिला सांगतात की तू
रोहीतला इथे शोधू नकोस. तु शिंगणापुरला जा, तिथे तुझे पती तुला नक्की भेटतील साधुच्या बोलण्यावर विश्वास
ठेवून नेहा शिंगणापुरला जाते. इथे स्वामी आपल्या शिष्याना शनिदेवाबद्द्ल सर्व माहिती प्रवचनाद्वारे देत असतात.
स्वामीजी शनिदेवाची संपूर्ण निर्माण कथा तसेच ब्रम्हदेव, महादेव यांना सुद्धा शनिदेवाच्या प्रकोपाला कसे
सामोरे जावे लागले हे कथेतुन सांगतात त्याचे चित्रीकरण आपण या चित्रपटात पाहू शकता तसेच राजा विक्रमादित्य
शनिदेवाला कसा शरण आला ही रोचक कथा सुद्धा या चित्रपटात बघू शकता.

एके दिवशी स्वामी रोहितला सांगतात की शनिदेवाचे महापर्व सुरु आहे तु शिंगणापूरला जा व त्यांच्या
सांगण्यावरून रोहीत शिंगणापुरला जातो. दुसरीकडे रोहीतचे आईबाबा सुद्धा शनिशिंगणापूरला निघतात कारण त्यांना आपली चुक समजते व शनीदेवच काहीतरी मार्ग दाखवतील या आशेने ते दर्शनासाठी येतात.

रोहीतचे आईवडील गरिबांना वस्त्रदान करत असताना रांगेत त्यांची भेट रोहीतशी होते ते त्याची विचारपूस
करतात पण रोहीतला काहीच आठवत नसल्याने तो तिथून पळ काढतो रोहित पळता पळता राहुलच्या गाडीला
धडकतो नेहाला हा अपघात दिसतो ती धावत येते व रोहितला पाहून रडू लागते रोहित शुद्धीवर येतो व शनीच्या चमत्काराने त्याची स्मृती परत येते व तो नेहाला ओळखतो इतक्यात रोहीतचे आईबाबा तिथे येतात तो त्यांनापण ओळखतो. जीवलग मीत्र राहुल पण तिथे येतो सर्वांच्या डोळ्यातून आनंदाअश्रू वाहू लागतात. रोहीतचे वडील नेहाचा हसत हसत स्वीकार करतात.

“शनीदेवाच्या कृपेमुळेच एक विभक्त झालेलं कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि सर्वत्र आंनदाचे वातावरण निर्माण
होते.”


Posters :