“गगन सदन तेजोमय” दिवाळी पहाट आणि “ध्यास” सन्मान!

773

“गगन सदन तेजोमय” दिवाळी पहाट आणि “ध्यास” सन्मान!

मुंबई : या वर्षी “कॉक्स अंड किंग्ज” आणि “युवर सिंगापूर” प्रस्तुत विनोद पवार, महेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून “गगन सदन तेजोमय”ची सलग बारावी दिवाळी पहाट साजरी होत आहे. या एक तपात दरवर्षी समाजसेवेचा ध्यास घेणाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार करण्याची परंपरा जाणीवपूर्वक जोपासली आहे. या वर्षीचा हा सन्मान हरखचंद सावला, अनुराधा प्रभुदेसाई, संदीप गुंड आणि ‘मातृछाया ट्रस्ट’ यांना प्रदान केला जाणार आहे.

मुंबईतील परळ भागात टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील कर्करोगग्रस्तांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करून त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचे काम हरखचंद सावला गेली तीस वर्षे निष्ठेने करीत आहेत. मानसिक आधारबरोबरच अन्न, औषधे, थंडीत गोधड्या देण्यापासून पोस्टकार्ड लिहून देणे, अपंगत्व आलेल्यांना कृत्रिम अवयव मिळून देणे आणि रुग्ण दगावला व कोणीच नसेल तर अंत्यसंस्कारही करणे अश्या सर्व प्रकारची सेवा त्यांच्या ‘जीवनज्योती ट्रस्ट’तर्फे केली जाते.

लडाख पहाण्यासाठी गेलेल्या  अनुराधा प्रभुदेसाई यांना कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहचलेच नाही का? असा प्रश्न पडला आणि त्यातूनच २००९ साली ‘लक्ष्य फाउंडेशन’ची निर्मिती झाली. समाजाला भारतीय सैनिकांनी जोपासलेल्या दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा या वृत्तीबरोबर त्यांच्या खडतर जीवनाची ओळख व्हावी  यासाठी ‘लक्ष्य फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘ऋणानुबंध सैनिकांशी’, ‘सैनिक माझा व्हेलेनटाइन’, ‘सैनिकांसोबत दिवाळी’, ‘एक पणती – एक सैनिक’ असे अनेक उपक्रम योजले जातात. २०१२ साली बँकेतील अधिकारीपदाचा राजीनामा देऊन या कार्याला त्यांनी वाहून घेतले आहे.

संदीप गुंड या शिक्षकाने ‘पष्टेपाडा’ या दुर्लक्षित, दुर्गम भागातील शाळेला ‘डिजिटल स्कूल’ बनविण्याचा घेतलेला ध्यास क्रांतिकारी आणि देशाला पथदर्शी  ठरला आहे. शाळेत सर्वच गैरसोई , मुलांची गावातील पाटलांच्या टीव्ही पुढे भरणारी शाळा पाहून त्यांच्या मनात चित्रदर्शी शाळेची कल्पना आली. त्यातून चाइल्ड थिएटरसारख्या वर्गखोल्या, फळ्याच्या जागी टच स्क्रीन, मुलांच्या हाती पाटी ऐवजी ट्याब, त्यावर रंजक शैक्षणिक अप हे स्वप्न न ठरता वास्तव बनलं. विजेच्या नसण्यावर मात करीत सोलर स्मार्ट स्कूल अश्या इ – लर्निंग संचाची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या या ध्यासाला सलाम या कार्यक्रमात केला जाणार आहे.


Photos :